Nagar Vachanalaya Ratnagiri

रत्नागिरी (जिल्हा) नगर वाचनालय

जनसामान्यांचे पहिले ग्रंथालय...

Ratnagiri Nagar Vachanalaya
रत्नागिरी (जिल्हा) नगर वाचनालय

117000 +

पुस्तके

आमचे उपक्रम

ज्ञान, वाचन आणि संस्कारांची समृद्ध परंपरा

रत्नागिरी (जिल्हा) नगर वाचनालय हे फक्त रत्नागिरीतीलच नव्हे तर महाराष्ट्रातील एक सांस्कृतिक केंद्र आहे. वाचनालय गेली १९७ वर्षे वाचकांची वाचन तृष्णा भागवीण्याचे कार्य करत आले आहे. तसेच वाचनालयाचे उद्दिष्ट व सामाजिक बांधिलकी जपत रत्नागिरीचा सांस्कृतिक वारसा जपण्याचे कार्य प्रामाणिकपणे करत आले आहे. यासाठी वर्षातून किमान 14 ते 15 सांस्कृतिक कार्यकम वाचनालयात घेतले जातात. यामध्ये सुप्रसिद्ध साहित्यिकांच्या तसेच स्वतःचा विशिष्ठ ठसा उमटवलेल्या व्यक्तिमत्वांच्या व्याख्यानांचे, मुलाखतीचे आयोजन वाचनालयात केले जाते. त्याच बरोबर समाजात, आर्थिक जगतात वेळोवेळी घडणाऱ्या ठळक घडामोडींवर प्रकाश झोत टाकणारे माहितीपर कार्यक्रम , वैद्यकीय-शैक्षणिक क्षेत्रातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन, त्याचबरोबर संगीत मैफल, विविध बाल शिबीर, ग्रंथ प्रदर्शने यांचे आयोजन केले जाते. या कार्यक्रमांना वाचनालयाला सुजाण नागरिकांचा नेहमीच उदंड प्रतिसाद लाभतो. वाचनालय बालवाचक तसेच गुणवंत विध्यार्थी याच्यासाठीही विविध उपक्रम राबवत असतो. त्यालाही मुलांकडुन उत्स्फूर्त प्रतिसाद लाभतो.

उपक्रम

ग्रंथालयातील विशेष उपक्रम

ग्रंथालयातील पुस्तकांसाठी आधुनिक मोबाईल रॅक सिस्टीम
ग्रंथालयातील पुस्तकांसाठी आधुनिक मोबाईल रॅक सिस्टीम
माहितीसाठी क्लिक करा
रत्नागिरी (जिल्हा) नगर वाचनालय संचलित पुस्तक विक्री केंद्र
रत्नागिरी (जिल्हा) नगर वाचनालय संचलित पुस्तक विक्री केंद्र
माहितीसाठी क्लिक करा
अभ्यासिका
अभ्यासिका
माहितीसाठी क्लिक करा
ग्रंथसाखळी योजना
ग्रंथसाखळी योजना
माहितीसाठी क्लिक करा
घरपोच पुस्तक सुविधा
घरपोच पुस्तक सुविधा
माहितीसाठी क्लिक करा

अन्य सुविधा

दुर्मिळ ग्रंथसंपदा

सन 1900 पूर्वीची दुर्मिळ ग्रंथसंपदा उपलब्ध आहे.

पिण्याचे पाणी

पिण्याच्या पाण्याची सुविधा.